अर्जुनसोबत असताना मलायकावर का आली तोंड लपवण्याची वेळ? Video Viral

'कपल गोल्स' देणाऱ्या अर्जुन- मलायका तो व्हिडीओ व्हायरल, मलायकाला का लपवावं लागलं तोंड?  

Updated: Aug 1, 2022, 08:34 AM IST
अर्जुनसोबत असताना मलायकावर का आली तोंड लपवण्याची वेळ? Video Viral title=

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट करण्यात आलं येतं. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता मलायका आणि अर्जुनने सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिली. त्यामुळे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न सतत चाहत्यांकडून विचारला जात आहे. पण आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे एका वेगळ्या कारणामुळे. सध्या सोशल मीडियावर अर्जुन आणि मलायकाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलायक स्वतःचा चेहरा लपवताना दिसत आहे. 

दरम्यान, मलायका आणि अर्जुनला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. पण व्हिडीओमध्ये दोघे चेहरा लपवताना दिसले. अर्जुनने मास्क लावला होता, तर दुसरीकडे मलायका कॅप आणि गॉगल्समध्ये चेहरा लपवताना दिसली. सध्या दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्जुनला कायन मिळते मलायकाची साथ... 
दोघांनी नुकत्याच एका फॅशनशोमध्ये हजेरी लावली होती. त्याच दरम्यान, त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी मलायकानं ज्या प्रकारे अर्जुनला त्याच्या शोसाठी चिअर केलं तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला पाहा व्हिडीओ... 

अर्जुन आगामी सिनेमे
अर्जुन कपूरचा 'एक व्हिलन रिटर्न' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अर्जुनच्या या सिनेमात त्याच्याशिवाय जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत. 

याशिवाय तो 'कुत्ते' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत राधिका मदान, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुढे, अर्जुन आसमान  भारद्वाजच्या 'अनटोल्ड' आणि अजय बहलच्या 'द लेडी किलर'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात भूमी पेडणेकर झळकणार आहे.