अभिनेत्री मलायका अरोराचे ट्रान्सपरंट ड्रेसमधील फोटो व्हायरल

मलायका अरोरा ही बॉलीवूडची फॅशन क्वीन आहे.

Updated: Jan 22, 2022, 07:01 PM IST
अभिनेत्री मलायका अरोराचे ट्रान्सपरंट ड्रेसमधील फोटो व्हायरल  title=

मुंबई  : मलायका अरोरा ही बॉलीवूडची फॅशन क्वीन आहे. जिचं फॅशनेबल लूक्स नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. मलायका अरोराच ओळख अभिनयामुळे नाही तर तिच्या फॅशन, फोटोशूट  आणि डान्सनेमुळे केली जाते आणि ती नेहमीच तिच्या फॅशन लूक्समुळे चर्चेत असते. 48 वर्षांची मलायका अरोरा ट्रान्सपरंट ड्रेस फोटोशूट तिच्या हॉट आणि सेक्सी लूकने दररोज सर्वांची मन जिंकते.

मलायका अरोरा तिच्या स्टाईल स्टेटमेंटने चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांकडून नेहमी पसंत केला जातो. वयाच्या 48 व्या वर्षीही ती इतकी फिट दिसते की तरुण अभिनेत्री तिच्यासमोर फिक्या पडतात. असंच एक फोटोशूट पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. खरंतर, नुकतंच मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते तिचं तोंड भरुन कौतुक करत आहेत.

मलायका अरोराने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. ज्यात ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. खरंतर मलायका अरोराने पांढऱ्या ट्रांन्सपरंट ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. तिचा हा ड्रेस राहुल मिश्राने डिझाईन केला आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. मलायकाचा हा आउटफिट हलक्या फॅब्रिकचा आहे. ज्यावर मॅचिंग थ्रेडचे फ्लोरल प्रिंट दिसत आहेत.

यासोबतच मलायकाने राखाडी रंगाचे हिल्स घातले आहेत. या लूकला परफेक्ट बनवण्यासाठी मलायकाने हेव्ही मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडत सिंपल हेअर स्टाईल मलायकाने ठेवली आहे. याचबरोबर तिने तिच्या गळ्यात जड नेकलेस परिधान केलाय.  तिचा हा संपूर्ण लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत तिने हील्स घातली आहेत. हे फोटो पाहून तिने हे फोटोशूट कोणत्यातरी मॅगझिनसाठी केलं आहे असं दिसतय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मलायका अरोरा सध्या अनेक टीव्ही शोमध्ये जज म्हणून काम करत आहे. यासोबतच ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. ही जोडी लवकरच लग्न करु शकते, अशी चर्चा आहे.