Malaika Arora । मलायकाचा थाटच भारी, महागड्या टोपी आणि पर्सचीच चर्चा; याच्या किमतीत 6 महिन्यांचा घर खर्च

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वॉक करताना स्पॉट झाली, तेव्हा तिचे कपडे सामान्य दिसत होते. मात्र, या साध्या लुकमध्ये ती एकदम स्मार्ट दिसत होती. तिचा हा साधा लूक मनाला थेट भिडणारा होता.  

Updated: May 3, 2022, 12:21 PM IST
Malaika Arora । मलायकाचा थाटच भारी, महागड्या टोपी आणि पर्सचीच चर्चा; याच्या किमतीत 6 महिन्यांचा घर खर्च title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) वॉक करताना स्पॉट झाली, तेव्हा तिचे कपडे सामान्य दिसत होते. मात्र, या साध्या लुकमध्ये ती एकदम स्मार्ट दिसत होती. तिचा हा साधा लूक मनाला थेट भिडणारा होता. मात्र, मलायकाच्या टोपी (Cap)आणि पर्सचीच जोरदार चर्चा आहे. या दोघांची किंमत 1 लाख रुपयांच्या घरात आहे. एवढ्या पैशात सहा महिन्यांचा घर खर्च भागू शकेल. 

मलायका अरोरा नेहमी फॅशनच्या बाबतीत एक पाऊल पुढे राहणे पसंत करते. यामुळे ती लेटेस्ट ट्रेंड्स अगदी जवळून फॉलो करताना दिसते. तिची झलक तिच्या रेड कार्पेट किंवा पार्टी लूकमध्येच दिसत नाही, तर नॉर्मल सी वॉकवरही ती सुपर स्टायलिश लूकमध्ये दिसली. याचा पुरावा त्याने पुन्हा एकदा दिला आहे. तिने वॉकसाठी खूप महागडी टोपी डोक्यावर परिधान केली होती.

पापाराझींनी तिला कॅमेरात केलं कैद  

मलायका नुकतीच घराबाहेर फिरायला गेली तेव्हा तिला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. तिचा लूक साधा होता, मात्र तो भारीच होता. लुकबद्दल सांगायचे तर, यावेळी तिने पांढऱ्या रंगाची सायकल शॉर्ट्स घातली होती, ज्यावर तिने लांब स्लीव्हलेस टी-शर्ट घातला होता. मलायकाने पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज देखील निवडले. त्याच वेळी, लूकमध्ये कॉन्ट्रास्टसाठी तिने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा घातली होती.

डोक्यावर महागडी टोपी  

मलायकाने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले होते. तिने ख्रिश्चन डायरची महागडी सन व्हिझर कॅपही घातली होती. तिची किंमत ऐकून धक्काच बसेल. ख्रिश्चन डायरच्या या मोटीफ प्रिंट कॅपची किंमत इंटरनेटवर $869.84 नमूद करण्यात आली आहे. भारतीय रुपयांमध्ये  बोलायचे झाले तर सुमारे 66,538 रुपये इतकी आहे.

छोटी पर्सही लक्झरी कंपनीची  

फक्त कॅपच नाही तर मलायकाच्या खांद्यावर दिसणारी छोटी पर्स देखील लक्झरी लेबल ख्रिश्चन डायरची होती. ही छोटी पर्स खूप महाग आहे. टोपीप्रमाणेच ही छोटी पर्सही महागडी आहे. या उभ्या सॅडल पर्सची किंमत ऑनलाईन साइटवर $1,230 म्हणून दाखवली गेली आहे. भारतीय चलनानुसार 94,103 रुपये आहे.