'पॅडमॅन' बद्दल मलाला यूसुफजई म्हणाली...

पद्मावतशी टक्कर आणि बॉक्सऑफिसरील नुकसान टाळण्यासाठी पॅडमॅनने चित्रपटाची रीलिज डेट बदलली आहे. आता 25 जानेवारीऐवजी 9 फेब्रुवारी रोजी पॅडमॅन रीलिज होणार आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 20, 2018, 12:15 PM IST
'पॅडमॅन' बद्दल मलाला यूसुफजई म्हणाली...   title=

लंडन : पद्मावतशी टक्कर आणि बॉक्सऑफिसरील नुकसान टाळण्यासाठी पॅडमॅनने चित्रपटाची रीलिज डेट बदलली आहे. आता 25 जानेवारीऐवजी 9 फेब्रुवारी रोजी पॅडमॅन रीलिज होणार आहे. 

मलालाने केलं कौतुक  

'द ऑक्सफोर्ड यूनियन' येथे पॅडमॅन चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना आणि मलालाची भेट झाली. येथे विद्यार्थ्यांसाठी या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवलं होतं. मलालाने या चित्रपटाच्या संदेशाचे कौतुक केले आहे. 'मी पॅडमॅन पाहण्यासाठी उत्सुक आहे. या चित्रपटातील संदेश प्रेरणादायी आहे.' असे मत मलालाने व्यक्त केला आहे. ऑक्सफर्डमध्ये दाखवला गेलेला 'पॅडमॅन' हा पहिला भारतीय चित्रपट आहे.  

ट्विकंल खन्नाने व्यक्त केलं मत 

ट्विकल खन्नाने या निमित्ताने 'पॅडमॅन' निर्मितीमागील कहाणी सांगितले. मासिकपाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं गरजेचं आहे. त्यासाठी समाजात जनजागृती निर्माण होणं गरजेचे आहे.  

ट्विकंलच्या मते, " सुरूवातीला मला असं वाटायचं की, मासिकपाळीबाबत भारत, बांग्लादेश अशा विकसनशील देशातच खुलेपणाने बोललं जात नाही. पण युकेमधील स्त्रियांना / मुलींना या काळात त्रास सहन करावा लागतो. महागड्या पॅड्समुळे युकेतही 10 वर्षीय मुली शाळेत जात नाही.  या दिवसात जुन्या कापडांचा वापर करतात. 

सत्यकथेवर आधारित 

पॅडमॅन हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. सामाजिक उद्योजक आणि कार्यकर्ते अरूणाचलम मुरूगनाथम यांनी तब्बल 20 वर्षांपूर्वी भारताच्या ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीन बनवणार्‍या मशीनचा शोध लावला. यामुळे ग्रामीण भागात स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध झाले. तसेच स्त्रीयांच्या आरोग्यच्या आणि स्वच्छतेला अधिक चालना मिळाली.