कोणाच्या लग्नात अडथळा आणणार ऐश्वर्या?

    ऐश्वर्या साकारणार खलनायकी भूमिका

Updated: Oct 2, 2019, 04:07 PM IST
कोणाच्या लग्नात अडथळा आणणार ऐश्वर्या?

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चनने हॉलिवूडच्या अॅजेलिना जोलीच्या आगामी सिनेमाला हिंदीत आवाज देण्याच निश्चित झालं आहे. ऐश्वर्या राय डिझनीच्या आगामी 'मेलफिसेंट द मिस्ट्री ऑफ एविल'च्या लीड रोल करता डबिंग करणार आहे. ऐश्वर्याचा आवाज 'मेलफिसेंट द मिस्ट्री ऑफ एविल' च्या हिंदी ट्रेलरमध्ये ऐकता येणार आहे. 

बुधवारी ऐश्वर्याने 'मेलफिसेंट द मिस्ट्री ऑफ एविल' सिनेमाचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये ऐश्वर्या मेलफिसेंटच्या लूक मध्ये दिसत आहे. काळ्या रंगाच्या कपड्यात ऐश्वर्या दिसत आहे. ऐश्वर्याने हा टिझर शेअर करताना, 'Happy to be part of the Disney Family'असं म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy to be part of the DISNEY Family 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

'मेलफिसेंट द मिस्ट्री ऑफ एविल' सिनेमाचा टिझर अगदी कमीवेळात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्रामवर आतापर्यंत लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहे. 

मेलफिसेंट हा सिनेमा हॉलिवूडच्या काही सुपरहिट फ्रेंचाइजीमधील एक आहे. या सिरीजमधील पहिला सिनेमा हा पाच वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. लोकप्रिय अभिनेत्री अँजेलीना जोली चा मेलफिसेंट हा एका परिच्या कथेचा सिनेमा आहे. डार्क फँटसी असलेला हा सिनेमा कायमच प्रेक्षकांसाठी खास राहिलेला आहे. 

पाच वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज होत आहे. यातील हिंदी वर्जन करता अँजेलीना जोलीला अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आवाज देत आहे. हा सिनेमा या महिन्यात रिलीज होत आहे. तसेच डिझनीसोबत शाहरूख खान नंतर ऐश्वर्या राय बच्चन ही डबिंग करता जोडली गेली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याला या करता हिंदी सिनेमापेक्षा खूप अधिक मानधन मिळालं आहे.