मल्लिका शेरावतचे या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन, म्हणाली, 'महिलेसह असं करणं म्हणजे...'

गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री मल्लिका शेरावत बॉलिवूडपासून दूर आहे, पण आता तिने वेब सीरिजच्या माध्यमातून पदार्पण केलं आहे.

Updated: Sep 23, 2021, 01:44 PM IST
मल्लिका शेरावतचे या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन, म्हणाली, 'महिलेसह असं करणं म्हणजे...'

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री मल्लिका शेरावत बॉलिवूडपासून दूर आहे, पण आता तिने वेब सीरिजच्या माध्यमातून पदार्पण केलं आहे. नुकताचं प्रदर्शित झालेल्या 'नकाब' सीरिजच्या माध्यमातून मल्लीका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सीरिजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत काही इंटिनेट सीन चित्रीत केले आहे. एका अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करणं सहज सोप असल्याचं वक्तव्य मल्लीकाने केलं आहे. एका मुलाखतीत मल्लीकने सीरिजमधील इंटिमेट सीनबद्दल उघडपणे मत मांडलं आहे. 

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत मल्लीका म्हणते, 'अभिनेत्रीशी जवळीक साधणं मुळीच कठीण नव्हतं. पुरूषाशी जवळीक साधण्यापेक्षा नक्कीच सोपे होतं...' बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मल्लिकाची ओळख आहे. 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'ख्वाहिश' चित्रपटाच्या माध्यमातून मल्लिकाने कलाविश्वात पदार्पण केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ख्वाहिश' चित्रपटात मल्लीकाने 17 किसिंग सीन दिले. त्यानंतर अभिनेता इमरान हशमी स्टारर 'मर्डर' चित्रपटात तिने बॉल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या. तेव्हा दिलेल्या बोल्ड सीन बद्दल ती तुफान चर्चेत होती. पण बॉलिवूडमध्ये मल्लीकाला हवं तेवढं यश मिळालं नाही. पण आता तिने वेब सीरिजच्या माध्यमातून पुन्हा जोरदार पदार्पण केलं आहे.