मल्लिकाच्या हॉट फोटोवरुन नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सोशल मीडियाच्या सध्याच्या जमान्यात सेलिब्रिटी ट्रोल होणे ही रोजचीच गोष्ट झालीये. प्रियंका चोप्रानंतर आता नेटकऱ्यांचा निशाणा ठरलीये मल्लिका शेरावत. तिने काही दिवसांपूर्वीच आपल्या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी तर तिची खिल्लीच उडवली. 

Updated: Oct 6, 2017, 08:31 PM IST
मल्लिकाच्या हॉट फोटोवरुन नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली title=

मुंबई : सोशल मीडियाच्या सध्याच्या जमान्यात सेलिब्रिटी ट्रोल होणे ही रोजचीच गोष्ट झालीये. प्रियंका चोप्रानंतर आता नेटकऱ्यांचा निशाणा ठरलीये मल्लिका शेरावत. तिने काही दिवसांपूर्वीच आपल्या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी तर तिची खिल्लीच उडवली. 

अनेकांनी तर या फोटोत मल्लिका तु आंटीसारखी दिसतेस. अनेकांनी तर म्हटलंय की बॉलीवूडमध्ये मल्लिका शेरावत ही अभिनेत्री होती हे पण आठवत नाहीये. काहींच्या मते मल्लिकाची जादू कधीच ओसरलीये. अनेकांनी तिच्या वयावरुन तिची जोरदार खिल्ली उडवलीये.

गेल्या अनेक दिवसांपासून मल्लिका रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. जेव्हा तिने आपल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते तेव्हा तिने कल्पनाही केली नसेल की नेटकरी असे काही रिप्लाय देतील. 

मल्लिका शेरावतने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये मर्डर, किस किस की किस्मत, प्यार के साईड इफेक्ट, गुरु, हिस्स सारख्या सिनेमांमध्ये काम केलेय. 

 

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on