मुंबई : अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. तिने 2003 मध्ये 'ख्वाहिश' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'मर्डर' सारख्या चित्रपटातील जबरदस्त बोल्ड सीनमुळे अभिनेत्री चर्चेत होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मल्लिका शेरावतने तिचा चित्रपट क्षेत्रातील वाईट अनुभव शेअर केला. अभिनेत्रीने सांगितलं की, तिच्याबद्दल कसं वाईट लिहिलें गेलं आणि बोललं गेलं, ज्यामुळे तिला देश सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
दिलेल्या एका मुलाखतीत मल्लिका शेरावत म्हणाली की, समाजाने अनेक वर्षांमध्ये उत्क्रांती केली आहे. जिथे लोक बोल्ड चित्रपटांपेक्षा अधिक आरामदायक झालं आहे. ती म्हणाली, “तिथले लोक खूप जजमेंटल होते. लोकं म्हणायचं, ती एक घाणेरडी महिला आहे, तिच्याकडे बिलकूल नैतिकता नाही, ती बिकिनी घालते, तिने किती वाईट सीन केले आहेत ते पहा, पडद्यावर किसींग सीन देखील दिले आहेत. पण हे सगळे अनुभवाचा एक भाग आहेत. आणि मला खूप आनंद आहे की, समाजचा खूप विकास झाला आहे. लोक अधिक सहनशील झाले आहेत. आज लोकांसाठी न्यूडिटी ही मोठी गोष्ट नाही "
मल्लिका शेरावत पुढे म्हणाली की, ''तिला मीडियाच्या एका विशिष्ट वर्गाने टारगेट केलं. ज्यात प्रामुख्याने महिलांचा समावेश होता. कारण पुरुषांना याच्याशी कधीही कसलीच समस्या नव्हती. माध्यमांच्या एका विशिष्ट विभागाने मला त्रास दिला. आणि मला खरोखर याचा खूप त्रास झाला, त्यापैकी बहुतेक स्त्रिया होत्या. पुरुषांनी नेहमीच माझं कौतुक केलं आहे. मला समजत नाही की, या स्त्रिया माझ्या विरोधात का आहेत, आणि माझ्यासाठी त्या इतक्या वाईट का आहेत? म्हणून मी काही काळासाठी देश सोडला कारण मला विश्रांती हवी होती. पण आज सगळ्यांनीच मला स्वीकारलं आहे, आणि आता माझ्यावर सगळेच खूप प्रेम करतात. ज्याचा मला खरोखर खूप आनंद आहे.''
आपल्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या यशानंतर मल्लिका शेरावतने परदेशात जाऊन हॉलीवूड आणि चीनमधील आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केलं. लवकरच ती ईशा गुप्तासोबत 'नाकाब' या मालिकेत दिसणार आहे.