Manasi Naik New Home : लोकप्रिय मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीनं आजवर अनेक गाजणारी गाणी आपल्याला दिली आहेत. त्यापैकी सगळ्यात गाजलेल्या गाण्यांविषयी बोलायचे झाले तर ते म्हणजे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ आहेत. मानसी गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसीनं स्वत: चं घर घेतलं आहे. तिच्या या नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अक्षय्य तृतीया हा वैशाख शुद्ध तृतीया म्हणेजच साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करण्यात येत. असं म्हणतात की या दिवशी कामाला सुरुवात केली तर त्यांचे चांगले फायदे मिळतात. आता मानसी नाईकनं देखील तिचं घर घेतलं आहे. त्याच्या गृह प्रवेशाचा व्हिडीओ मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
मानसीनं शेअर केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला पुजारी हे पूजा करताना दिसत आहेत. तर गृहप्रवेशाची संपूर्ण क्रिया या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर डोक्यावर कळस घेऊन मानसी संपूर्ण घरात फिरते. हा व्हिडीओ शेअर करत मानसी म्हणाली, 'प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं, जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं, दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं, या रखरखीच्या जगण्यात वावरतांना, उमेद देणार डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं, माझी ऊर्जा स्थान बनेल माझे नवीन घर, मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर, संस्कारांची शिदोरी असते एक घर, माझे घर,' असं मानसी म्हणाली.
पुढे मानसी म्हणाली, अक्षय राहो मानवता, क्षय हो ईर्ष्येचा, जिंकू दे प्रेमाला आणि हरू दे पराभवाला, सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा, असे कॅप्शन मानसीनं दिलं आहे.
हेही वाचा : 'पण मी अंकिता वालावलकरचा...', क्रशबद्दल विचारताच ओंकार भोजनेचा खुलासा
मानसीनं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, साक्षात लक्ष्मी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खूप खूप शुभेच्छा मनु... तुझ्या या नवीन घरात कायम सुख-समृद्धी राहो. खूप प्रेम.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अभिनंदन मॅडम तुमचं सर्व स्वप्न पूर्ण होउ दे स्वामी चारणी हीच प्रत्ना.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'खुप खुप अभिनंदन खुप खुप शुभेच्छा, स्वतःचे घर असणे म्हणजे जन्माचे सार्थक होणे असते , अभिनंदन डिअर.'