Video : Manike Mage Hithe गाण्याचा अर्थ पाहा, तुम्हीही व्हाल याचे फॅन

गाण्याची धून इतकी प्रभावित करणारी आहे, की या स्वरांची सर्वांनाच भुरळ पडत आहे.   

Updated: Sep 27, 2021, 08:50 AM IST
Video : Manike Mage Hithe गाण्याचा अर्थ पाहा, तुम्हीही व्हाल याचे फॅन  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मागच्या काही काळापासून सोशल मीडिया आणि टेलिव्हीजनवर एकाच गाण्याचे स्वर अनेकदा ऐकू येत आहेत. हे स्वर काहीसे वेगळे असले, त्यातील शब्दांचा अर्थ उमगत नसला, तरीही गाण्याची धून इतकी प्रभावित करणारी आहे, की या स्वरांची सर्वांनाच भुरळ पडत आहे. 

हे गाणं एका श्रीलंकन गायिकेनं गायलं आहे. Yohani Diloka De Silva असं या गायिकेचं नाव. तिन गायलेल्या एका गाण्याला कमालीची लोकप्रियता मिळत असून, बॉलिवूडकरांपासून ते अगदी मराठी कलाविश्वापर्यंत आणि इतरही सर्वसामान्यांपर्यंतही सर्वांमध्येच या गाण्याची भुरळ पाहायला मिळत आहे. तामिळ भाषेतील वाटणाऱ्या या गाण्याची मूळ भाषा आहे सिंहली. 

काय आहेत या गाण्याचे बोल आणि त्याचा अर्थ? 
मुळ गाणं...

मणिके मांगे हिथे
मडुवे नूरा हंगम यवि
अविलेवी

नेरिये नुम्बे नागे
मांगे नेट यह मेहा यावी
सिहीवेवी

माँ हीथा लांगमा दावातेना
हारु पेमका पतलेना
रउवा नारी
मनहारी
सुकुमालि नुम्बे थमा 

आजा पास मेरे
न हो तू शाय
बस चाहता हूँ हाँ बेबी
हो जा तू माइन
दिल को तेरे मेरे
कर दूंगा जॉइन
ले आऊंगा तुझको
लंका तो मुंबई

क्या तेरे दिल मैं है बता
मेरे जीने की वजह
रउवा नारी
मनहारी
सुमुमलई नुम्बे थमा

मेरे प्यार की वजह
मेरे साँसों मैं समां
रउवा नारी
मनहारी
सुमुमलई नुम्बे थमा

हीथा लांगमा दावातेना
हारु पेमका पतलेना
रउवा नारी
मनहारी
सुकुमालि नुम्बे थमा 

मणिके मांगे हिथे
मडुवे नूरा हंगम यवि
अविलेवि

नेरिये नुम्बे नागे
मांगे नेट यह मेहा यावी
सिहीवेवी

मैं करता हूँ स्टॉक
क्यों है तू इतनी हॉट
चल चलते है हाँ बेबी
हम शोप्पेर्स स्टॉप
फिर करते रहना शॉपिंग
टिल १२ ओ क्लॉक
करेंगे पुरे सारे हम अपने शौक

मणिके मांगे हिथे

मडुवे नूरा हंगम यवि

अविलेवि

नेरिये नुम्बे नागे
मांगे नेट यह मेहा यावी
सिहीवेवी

माँ हीथा लांगमा दावातेना
हारु पेमका पतलेना
रउवा नारी
मनहारी
सुकुमालि नुम्बे थमा 

गाण्याचा अर्थ.... 
'माझ्या हृदयात असणारा प्रत्येक उत्कट भाव हा तुझाच आहे. तुझ्या कमनीय बांधा जणून धगधगती ज्वाळा. जिच्यावरुन माझी नजरही हटत नाही आहे. मी तुझ्याच अधीन आहे.  

तू माझ्या हृदयाच्या फार जवळ आहेस. तू एक ओळखीचीच जाणीव आहेस. तू जणू एक देवी आहेस. मला अतिशय प्रिय आहेस. माझं मनही माझं ऐकत नाहीये कारण, तुझ्यामुळंच मला आनंद होतोय'. 

या गाण्यामध्ये बऱ्याच ओळी या पुन्हा पुन्हा म्हटल्या गेल्या असून, त्यांचा अर्थ हा एकसारखाच आहे. मध्येच रॅपही असल्यामुळं गाणं एका वेगळ्याच ढंगात ऐकणाऱ्यांच्या भेटीला येतं.