ही मुलगी आठवतेय का? तिच्या मीमला मिळालीये 'इतकी' किंमत...

 प्रचंड गाजलेलं एक मीम म्हणजे एका लहान मुलीचं. 

Updated: Sep 27, 2021, 07:58 AM IST
ही मुलगी आठवतेय का? तिच्या मीमला मिळालीये 'इतकी' किंमत...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर अनेक मीम्स दर दिवशी व्हायरल होत असतात. त्यामध्येत काही मीम्सना नेटकऱ्यांची किंवा ठराविक अॅप युजर्सची विशेष पसंती मिळते. विशिष्ट परिस्थिती किंवा प्रसंगांसाठी हे मीम्स वापरण्यात येतात. यामध्येच प्रचंड गाजलेलं एक मीम म्हणजे एका लहान मुलीचं. 

इवलेसे दोन दात, चेहऱ्यावर अनेक भाव आणि कोपऱ्यात कुणीकडे रोखलेली नजर; अशी ही मुलगी आणि तिचं मीम तुम्हाला आठवतंय का? अवघ्या दोन वर्षांच्या या मुलीनं नेटकऱ्यांना वेड लावलं होतं. विविध प्रसंगांच्या वेळी हे मीम वापरलं गेलं आणि पाहणाऱ्यांसाठी हा एक कुतूहलाचाच विषय ठरला. 

आता म्हणे याच चिमुकलीच्या मीमला NFTवर 25 Ethereum (CRYPTO: ETH) म्हणजेच  $75k इतकी किंमत मिळाली आहे. दुबईस्थित एका म्युझिक कंपनीनं हे मीम खरेदी केलं आहे. 3F Music असं या कंपनीचं नाव आहे. 

Side-Eyeing Chloe ही एका व्हिडीओचा भाग असून, युट्यूबवर या व्हिडीओला 20 मिलियन व्ह्यूज आहेत. 2013 मध्ये एका महिलेनं तिच्या मुलींना डिस्नेलँडच्या सहलीवर नेलं होतं. हे त्यांच्यासाठी एक सरप्राईज होतं. त्यावेळी त्या महिलेची एक मुलगी, Chole हिनं अगदी काहीच वेगळं वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. तिच्याचेहऱ्यावरील भाव सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले. 

कोलचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर असणारे भाव असंख्य वेळा तितक्याच असंख्य प्रसंगांसाठी वापरले गेले. एका अर्थी हे व्हायरल प्रकरण या कोलला कसं प्रसिद्ध करुन गेलं याचंच हे एक उदाहरण.