नेटफ्लिक्सच्या 'या' सिनेमांत दिसणार मनीषा कोइराला

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Feb 18, 2020, 02:39 PM IST
नेटफ्लिक्सच्या 'या' सिनेमांत दिसणार मनीषा कोइराला

मुंबई : हिंदी सिनेमातील सर्वात मोठा प्रयत्न नेटफ्लिक्सवर करण्यात आला. 'लस्ट स्टोरी' हा चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार कथांचा एक सिनेमा आहे. या सिनेमातील कथांच दिग्दर्शन करण जोहर, अनुराग कश्यप, जोया अख्तर आणि दिवाकर बॅनर्जी यांनी केलं आहे.

या सिनेमातून नेटफ्लिक्सवर मनीषा कोइराला पदार्पण केलं होतं. आता मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मनीषासोबत या सिनेमांत निकिता दत्ता, प्रीत कमानी आणि सेंसेशनल युवा गायिका शिरली सेतिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नुकताच या सिनेमाचा नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या युट्यूब चॅनलवर एक प्रमोशनल फर्स्ट लूक व्हिडिओ शेअर केला आहे. 'मस्का' सिनेमातून पुन्हा एकदा मनीषाच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे.