संशय येताच सारा अली खानला विमानतळावर रोखलं आणि...

ही होती अडचणीची बाब.... 

Updated: Feb 18, 2020, 02:25 PM IST
संशय येताच सारा अली खानला विमानतळावर रोखलं आणि...
सारा अली खान

मुंबई : 'लव्ह आज कल' या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री सारा अली खान एका अडचणीत सापडल्याचं वृत्त 'डीएनए'ने प्रसिद्ध केलं आहे.  अमेरिकेच्या विमानतळावर साराला अशा एका प्रसंगाचा सामना करावा लागला होता, पण यावेळी तिचं नाव हा मुद्दा नव्हता. तर, तिच्या ओळखपत्रांवर असणारी छायाचित्र यामध्ये अडचणीची बाब ठरली होती. 

साराने ज्या प्रकारे स्वत:मध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणले आहेत, ते पाहता पुन्हा सैफ अली खानची ही लेक चर्चेत आली आहे. याचविषयी सांगताना सारा म्हणाली, 'माझा नियमीत व्हिसा, स्टुडंट व्हिसा यावर असणारी छायाचित्र आणि सध्याची मी यामध्ये बरीच तफावत आहे. त्यामुळे हे नेमकं चाललंय तरी काय, असाच त्यांचा प्रश्न असतो.' आपली ही सर्व छायाचित्र पाहता हा संशयित प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. त्यातही, 'माझं आडनाव सुलतान आणि ही अमेरिका....' असा उपरोधिक सूरही तिने आळवला. 

साराने आयडी कार्ड बनवला तेव्हा तिचं वजन ९६ किलो इतकं होतं. त्यामुळेच अमेरिकेत तिला या विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं अशी माहिती साराने दिली. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात साराने शिक्षण घेतलं आहे. शिवाय या ठिकाणी ती कायमच भेटही देत असते. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

'केदारनाथ' या चित्रपटातून प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या साराने फार कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये तिचं स्थान कायम केलं. मुख्य म्हणजे चाहत्यांनीही तिचा लगेचच स्वीकार केला. नुकतीच ती अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत 'लव्ह आज कल' या चित्रपटातून झळकली होती. येत्या काळात सारा 'कूली नंबर १' या चित्रपटातून अभिनेका वरुण धवन याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.