मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मानसीनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरामध्ये (Mansi Naik Husband Pradeep Kharera) दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. (Mansi Naik Social Media)
मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं ब्लेझर परिधान केलं आहे. मानसीचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, हा फोटो शेअर करत मानसीनं जे कॅप्शन दिलं आहे. त्या कॅप्शननं नेटकऱ्यांनी लक्ष वेधले आहे. वाईट बातमी - Nothing lasts Forever, चांगली बातमी Nothing lasts Forever काही तरी खास, असं कॅप्शन मानसीनं हे फोटो शेअर करत दिले आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी मानसीचे हे फोटो आवडले नाहीत. त्यांनी मानसीला ट्रोल केलं आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला हा फोटो डिलीट करण्यास सांगितलं आहे. (Mansi Naik Post Viral)
मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते. (mansi naik and husband pradeep kharera are separated rumuord start after actress social media post viral)