लागीर झालं जी मालिकेतील राहुल्याने घेतली ही कार

लागीर झालं जी या मालिकेतील राहुल्या म्हणजे राहुल मगदूम.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 6, 2018, 03:49 PM IST
लागीर झालं जी मालिकेतील राहुल्याने घेतली ही कार  title=

मुंबई : लागीर झालं जी या मालिकेतील राहुल्या म्हणजे राहुल मगदूम.

अगदी कमी वेळात या कलाकाराने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. विनोदी पण नातेसंबंधातील हळुवारपणा जपणारा राहुल्या ‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा त्याचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला हा कलाकार.

मराठी अॅवॉर्डच्या दुनियेतही आपलं वेगळंपण जपतो. अशी किर्ती मिळवलेल्या या राहुलची प्रगतीतर ओघानेच आहे. सध्या राहुल खूप फोर्म मध्ये आहे कारण त्याने भल्या भल्याने जे शक्य होत नाही ते करून दाखवले आहे. राहुल मगदूम याने नवीन BMWX3 हि कार घेतली आहे. ही बातमी लागीर झालं जी मधील आज्याचा दोस्त असणारा विक्या म्हणजेच निखील चव्हाण याने instagram वरून दिली. यानंतर सगळ्यांनी राहुलला शुभेच्छा दिल्या.

मात्र या बातमीमागील सत्य असं आहे की, निखिल आणि दिग्दर्शक तेजपाल यांनी राहुलसाठी हे खास प्रँक केलं होतं. तेजपालच्या कुटुंबियांनी ही बीएमडब्ल्यू घेतली होती. त्यांनी मालिकेतील सगळ्या कलाकारांनी आणि क्रू मेंबरला सांगितले की, ही गाडी राहुले विकत घेतली. त्यामुळे त्यांनी केलेला हा प्रँक खूप गाजला. 

राहुल चा जन्म २१ जानेवारी १९९१ साली उरून तालुका इस्लामपूर येथे झाला. त्याने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून येथून डिग्री घेतली. लागीर झाला जी या मालिकेच्या माध्यमातून राहुल घराघरात लोकप्रिय झाला.