#पुन्हानिवडणूक वादावर सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केल्यानंतर.... 

Updated: Nov 15, 2019, 07:00 PM IST
#पुन्हानिवडणूक वादावर सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि राज्याच्या, नव्हे तर देसाच्याही राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या प्रत्येक घडामोडीला एक वेगळं वळण मिळत आहे. दरदिवसाआड मिळणाऱ्या या वळणामध्येच शुक्रवारी भर पडली ती म्हणजे पुन्हा निवडणूक होणार का?, या प्रश्नाची. याला निमित्त ठरलं होतं ते म्हणजे #पुन्हानिवडणूक हा ट्रेंड होणारा हॅशटॅग. 

सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी आणि इतर काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर हा हॅशटॅग पोस्ट केला. ज्यानंतर अनेकांना या हॅशटॅगचा अर्थच उलगडत नव्हता. याच प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, धनंजय मुंडे यांनी ट्विट करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारचं ट्विट करणाऱ्या कलाकारांनी जनतेची माफी मागावी असा सूरही त्यांनी आळवला होता. ज्यावर उत्तर देत अभिनेता सिद्धार्थ जाधव याने थेट आणि स्पष्ट शब्दांच हे ट्विट करण्यामागचा हेतू सर्वांसमक्ष ठेवला आहे.

#पुन्हानिवडणूक म्हणणाऱ्या कलाकारांनी माफी मागावी- धनंजय मुंडे  

''आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा 'धुरळा' आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालं आहे. म्हणून ते आपल्याशी शेअर केलं'', असं सिद्धार्थने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं. 

ट्विट करण्यामागची आपली 'भूमिका' लवकरच कळेल अस लिहित सिद्धार्थने भूमिकेवर जोर दिला. तर, आपल्याला इतरांच्या भावनांचा आदर असल्याची बाब अधोरेखित करत कोणाचीही दिशाभूल करण्याचा हेतू नसल्याचं सिद्धार्थने स्पष्ट केलं.