'माझी तुझी रेशीमगाठ'मधील 'परी'चा प्रिती झिंटाच्या गाण्यावर डान्स, नम्रता संभेराव म्हणाली...

सध्या मायरा ही तिच्या कुटुंबाबरोबर काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आता मायराने बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या गाण्यावर डान्स केला आहे. 

नम्रता पाटील | Updated: Mar 24, 2024, 04:15 PM IST
'माझी तुझी रेशीमगाठ'मधील 'परी'चा प्रिती झिंटाच्या गाण्यावर डान्स, नम्रता संभेराव म्हणाली... title=

Myra Vaikul Preity Zinta Song Dance : मराठी मालिका क्षेत्रातील लोकप्रिय बालकलाकार म्हणून मायरा वायकुळला ओळखले जाते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. यात तिने परी हे पात्र साकारले होते. तिच्या या पात्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मायराने तिच्या निरागस अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सध्या मायरा ही तिच्या कुटुंबाबरोबर काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आता मायराने बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या गाण्यावर डान्स केला आहे. 

मायरा ही सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या मायरा काश्मीरच्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. मायराने सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर काश्मीरमधील विविध फोटो पोस्ट केले आहे. यातील काही व्हिडीओत ती बर्फावर स्केटिंग करताना दिसत आहे. तर काही व्हिडीओत ती बर्फासोबत खेळताना दिसत आहे.

आता नुकतंच मायराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती श्रीनगरमधील दाल सरोवरच्या शिकाराचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी तिने काश्मीरमधील पारंपारिक ड्रेस परिधान करत एक रील केले आहे. यात ती प्रिती झिंटाच्या 'बुमरो बुमरो' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने "बुमरो बुमरो, तुम्हाला या रीलचा दुसरा भाग पाहायला आवडेल का, कमेंट करुन नक्की सांगा", असे म्हटले आहे. तिच्या या व्हिडीओवर नम्रता संभेरावने हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. 

'बुमरो बुमरो' गाणे 2000 साली प्रदर्शित

दरम्यान 'बुमरो बुमरो' हे गाणे ऋतिक रोशन आणि प्रिती झिंटाच्या 'मिशन काश्मीर' या चित्रपटातील आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केले होते. या चित्रपटात संजय दत्त , हृतिक रोशन, जॅकी श्रॉफ, प्रीती झिंटा, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मायरा काही महिन्यांपूर्वी ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळाली.

‘नाच गं घुमा’ चित्रपट 1 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला 

आता लवकरच मायरा हिरण्यगर्भ मनोरंजन निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी हा निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  हा बहुचर्चित चित्रपट 1 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.