'जागतिक रंगभूमी दिना'निमित्त मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'बिग बॉसनंतर माझ्या...'

तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने शिवाजी नाट्यमंदिरातील काही दृश्य दाखवली आहेत.

Updated: Mar 27, 2024, 10:14 PM IST
'जागतिक रंगभूमी दिना'निमित्त मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'बिग बॉसनंतर माझ्या...' title=

Ruchira Jadhav World Theatre Day : दरवर्षी 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. रंगभूमीचे महत्त्व जगापर्यंत पोहोचावे आणि लोकांमध्ये त्याबद्दल आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 1961 पासून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. रंगभूमीकडे फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून नव्हे, तर लोकांपर्यंत पोहोचण्याचे उत्तम माध्यम म्हणून पाहिले जाते. विविध कला, संस्कृती आणि परंपरा जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रंगभूमी हा उत्तम मार्ग समजला जातो. आता याच निमित्ताने एका मराठी अभिनेत्रीने पोस्ट केली आहे. 

छोट्या पडद्यावरील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिने माया हे पात्र साकारले होते. त्यानंतर ती 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात झळकली. यामुळे ती पुन्हा प्रसिद्धीझोतात आली. गेल्या काही दिवसांपासून रुचिरा 'तु तू मी मी' या नाटकात झळकताना दिसत आहे. तिच्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने शिवाजी नाट्यमंदिरातील काही दृश्य दाखवली आहेत. त्यात तिचे काही चाहते तिला नाटक संपल्यानंतर भेटायला येत असल्याचेही दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

रुचिरा जाधवची पोस्ट

"जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. रंगभूमी ज्या ठिकाणाहून माझा अभिनयाचा प्रवास सुरु झाला आणि बिग बॉसनंतरचे माझे व्यावसायिक नाटक “तू तू मी मी”. ही माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्कृष्ट गोष्ट होती. कारण मला तुमच्या सर्वांसोबत समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळाली.  माझ्यामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये कोणतीच भिंत नव्हती. नाटक झाल्यावर तुम्ही जेव्हा बॅकस्टेज भेटायला येता ना, ते feeling फार कमाल असतं. आम्ही नट फार grateful असतो त्या क्षणांसाठी. या नाटकामुळे मला नाट्यसृष्टीमधल्या दिग्गजांसोबत काम करता आलं ते म्हणजे भरत जाधव आणि केदार शिंदे. त्यासाठी कायमच आभारी राहिन. रंगभूमी जिथे माझे मूळ आहे", असे रुचिराने म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

दरम्यान रुचिरा जाधवच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. रुचिराने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती. यासोबतच ती ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही झळकली. रुचिरानं मालिकांशिवाय नाटक आणि चित्रपटातही काम केलं आहे.