'काका मंगळसूत्र दिसत नाहीये का?' लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

सध्या सोनाली ही ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात झळकणार आहे. आता सोनालीने लग्नावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सडेतोड उत्तर दिले आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 7, 2024, 10:58 PM IST
'काका मंगळसूत्र दिसत नाहीये का?' लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर title=

Sonalee Kulkarni Marriage Comment : मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. सोनालीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वी सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले. तिच्या या चित्रपटातील कामाचे सर्वत्र कौतुक झाले. आता सध्या सोनाली ही ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात झळकणार आहे. आता सोनालीने लग्नावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सडेतोड उत्तर दिले आहे. 

सोनाली कुलकर्णीने नुकतंच तिच्या कुटुंबातील एका विवाहसोहळ्याला हजेरी लावली. याचे काही खास फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. या व्हिडीओ तिचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. यावेळी सोनालीने निळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली असून त्यासोबत पारंपारिक दागिनेही घातले आहेत. लग्नसोहळ्याची धामधूम आणि कुटुंबासोबतचे काही आनंदाचे क्षण असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. 

सोनाली कुलकर्णीचा नवीन व्हिडीओ व्हायरल

यानंतर सोनालीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सोनाली ही पारंपारिक नथ नाकात घातलेले असताना जेवायचे कसे हे दाखवताना दिसत आहे. यात ती नथ एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने घास खाताना दिसत आहे. तिने या फोटोला नाकापेक्षा असे कॅप्शन देत डोळे दाखवणारा इमोजी पोस्ट केला आहे. 

सोनालीचे सडेतोड उत्तर

या फोटोवर एका नेटकऱ्याने तिच्या लग्नावरुन कमेंट केली आहे. "लग्न झालं नाही का अजून वय लय दिसू लागलं", अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर सोनालीने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. "काका मंगळसूत्र दिसत नाहीये का ? चश्मा लावून पाहा", असे सोनाली कुलकर्णीने उत्तर दिले आहे. सोनालीचे हे उत्तर पाहून अनेक नेटकरी तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. आता जेवण कसं करायचं असा प्रश्न पडला होता आणि तू उत्तर दिलं, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. त्यावर तिने म्हणूनच जनजागृतीसाठी हा व्हिडीओ शेअर केला असे म्हटले आहे.

Sonalee Kulkarni Marriage Comment

दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा 2 फेब्रुवारी 2020 रोजी दुबईत साखरपुडा पार पडला. त्यानंतर 7 मे 2021 रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले. सोनाली आणि कुणाल यांनी 7 मे 2021 मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने सोनाली आणि कुणालचा विवाह पार पडला होता. त्यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी म्हणजेच 7 मे 2022 रोजी सोनाली आणि कुणालने थाटामाटात लग्नगाठ बांधली. यावेळी तिचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x