मुंबई : मराठी सिनेतारकांनी एका आकपेला गाण्याची निर्मिती केली आहे. आकपेला साँगमध्ये कोणत्याही प्रकारच्या उपकरणांचा वापर न करता, तोंडाच्या माध्यमातून गाणं गायलं आहे, प्रत्यक्षात कोणत्याही संगीत उपकरणाचा यात वापर केला जात नाही. हे सर्व कलाकार या गाण्यात सहभागी झाले आहेत, तसेच यात सुरूवातीपासून ते आतापर्यंतची जास्तच जास्त हिट गाणी गाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अगदी तुम्हाला यात ओम भट्ट स्वाहा पासून ते खंडाळा घाट, ते जिंदगी जिंदगी, शिंपल्यांचे शो पीस नको, जीव अडकला मोत्यात, ते रंगला दमला असा, हरिहरण यांच्यापर्यंत सर्व गायकांचा समावेश आहे. तसेच सर्वांच आवडतं सैराटचाही समावेश आहे, बाई वाड्यावर या, ते या रावजी भावजी, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, तर सचिनलाही यात सोडण्यात आलेलं नाही. सर्वांचं आवडतं चला हवा येऊ द्याचाही यात समावेश आहे. अमेय खोपकरची ही निर्मिती आहे.