'सैराट' फेम सल्या- लंगड्या पुन्हा एकत्र

पाहा अरबाज आणि तानाजी नेमके एकत्र कशासाठी आले आहेत...   

Updated: Oct 22, 2020, 08:29 AM IST
'सैराट' फेम सल्या- लंगड्या पुन्हा एकत्र

मुंबई : मैत्रीचं नातं हे शब्दांत व्यक्त करता येत नाही. आजवर बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातून हे अनोखं नातं तितक्याच अनोख्या अंदाजात प्रेक्षांच्या भेटीला आलं आहे. सैराट या चित्रपटातूनही या नात्याची एक वेगळी बाजू आणि अफलातून कलाकारांनी साकारलेले मित्र पाहायला मिळाले होते. प्रेक्षकांच्या आजही स्मरणात् राहिलेली ही जो परश्या, सल्या आणि लंगड्याची ही 'सैराट' मैत्री. 

आता याच चित्रपटातील मित्रांची एक जोडी, म्हणजेच सल्या- लंगड्या अर्थात अरबाज आणि जानाजी पुन्हा एकदा प्रेक्षांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. 

आपल्या पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुन्हा तानाजी आणि अरबाज कुठे दिसतील कोणत्या चित्रपटात कोणत्या माध्यमात दिसतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याला उत्तर म्हणजे सुनिल मगरे दिग्दर्शित 'फ्री हिट दणका' हा चित्रपट.

मैत्रीची एक वेगळी परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा जोमाने चित्रपटसृष्टी काम करू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर 'फ्री हिट दणका' या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. 

 

सुनिल मगरे यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटातील  संवाद, पटकथा आणि गीत लेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव आणि दिग्दर्शक सुनिल मगरे सांभाळत असून सुधाकर लोखंडे हे या चित्रपटाचे सह निर्माता आहेत. तेव्हा आता नव्या जोमानं मैत्रीचं हे नातं कलाविश्व कसं गाजवतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.