मराठी सिनेमा बॉलिवूडवर पडणार भारी, 'राम सेतू' आणि 'थॅंक गॉड' साठी ठरू शकतो धोका!

'हा' मराठी चित्रपटा पडणार बॉलिवूडवर भारी

Updated: Oct 23, 2022, 11:24 AM IST
मराठी सिनेमा बॉलिवूडवर पडणार भारी, 'राम सेतू' आणि 'थॅंक गॉड' साठी ठरू शकतो धोका! title=

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर राम सेतू (Ramsetu) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर थँक गॉड (Thank God) या चित्रपटावर सर्वांचे लक्ष लागले आहे. बॉलिवूड आधीच अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत दाक्षिण आणि हॉलिवूडचा धोका दिसत आहे. पण दिवाळीत या बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या चित्रपटांसाठी खऱ्या अर्थाने आव्हान असणारा चित्रपट म्हणजे मराठीचा 'हर हर महादेव' (Har Har Mahadev). अभिजित देशपांडे यांचा हा चित्रपट संपूर्ण भारतात हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. आजकाल हिंदी प्रेक्षक ज्या प्रकारचा कंटेट पाहत आहेत, त्या प्रकारात 'हर हर महादेव' हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. मराठी-हिंदीसोबतच हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : शॉर्ट्स घालून मंदिरात जाणं एकता कपूरला पडलं महागात, झाली ट्रोलिंगची शिकार

'हर हर महादेव' ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे एकेकाळचे सरसेनापती बाजी प्रभू देशपांडे यांची कथा आहे. चित्रपटात सुबोध भावेनं छत्रपती शिवाजी महाराजांची तर शरद केळकरने बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे मराठीतलं मोठं नाव आहे, तर शरद केळकरचं हिंदीत चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. बाजी प्रभू देशपांडे यांच्या मुघलांविरुद्धच्या लढ्याची संपूर्ण कथा ही या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट मराठीतच नव्हे तर हिंदीतही प्रेक्षकांच्या मनात उत्साह भरून टाकणारा विषय असल्याचे निर्माता-दिग्दर्शकाचे मत आहे. चित्रपटाच्या या ऐतिहासिक कथेत 300 मराठा योद्धे 12 हजार मुघल सैनिकांशी लढा देतात आणि जिंकतात. या युद्धात मराठा सैन्याचं नेतृत्व बाजी प्रभू देशपांडे यांच्याकडे होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दक्षिणेकडील चित्रपटांनंतर कन्नडच्या 'कांतारा'नं ज्याप्रकारे हिंदी प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे, त्यावरून हिंदी प्रेक्षकांना चांगली कथा पाहिजे, मग ती भाषा कुठलीही असो हे सगळ्यांना कळले आहे. 'हर हर महादेव'चे चित्रीकरण भव्य पद्धतीने करण्यात आले असून त्याची ऐतिहासिक कथा आहे. अशा परिस्थितीत 'कांतारा' नंतर 'हर हर महादेव' हिंदीतही देशभक्तीमुळे चर्चेचा विषय बनण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शरद केळकरचा अभिनय जबरदस्त आहे. हा ट्रेलर 'राम सेतू' आणि 'थँक गॉड'साठी अडचण होऊ शकते असे म्हटले जात आहे. 'हर हर महादेव' हे युद्धनाट्य आहे. अशा परिस्थितीत जेव्हा 'राम सेतू' आणि 'थँक गॉड' चित्रपटगृहांमध्ये दाखल होतील, तेव्हा 'कांतारा' आणि हॉलिवूडच्या 'ब्लॅक अॅडम'सोबतच त्यांच्यासमोर ‘हर हर महादेव’चं आव्हानही उभं राहणार आहे.