close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्जुन - मलायका लग्नाची तारीख ठरली

बॉलिवूडमधील मोस्ट पॉप्यूलर कपलच्या यादीत या जोडप्याचा अव्वल क्रमांक लागतो.

Updated: Mar 27, 2019, 05:13 PM IST
अर्जुन - मलायका लग्नाची तारीख ठरली

मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रेमाचे वारे नेहमीच वाहत असतात. त्यात अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र होतच असतात. बॉलिवूडमधील मोस्ट पॉप्यूलर कपलच्या यादीत या जोडप्याचा अव्वल क्रमांक लागतो. मागील काही दिवसांपासून अर्जुन - मलायकाच्या लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. कदाचित या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे कपल 19 एप्रिल 2019 ला विवाह बंधणात अडकणार आहे. 

अर्जुन - मलायका नातेवाईक आणि मित्र - मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मलायकाच्या गर्लगँगचा सुद्धा समावेश आहे. त्याचप्रमाणे अर्जुनचा खास मित्र अभिनेता रणवीर सिंग पत्नी दीपिका पादुकोन सोबत उपस्थित राहणार आहे. बॉलिवूडकर या दोघांच्या लग्नासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये करण जोहर आणि अभिनेत्री करिना कपूरचे नाव पुढे येत आहे.   

अर्जुनसोबतच्या नात्याबाबत मलायकाने मौन सोडले. ती म्हणाली, 'आयुष्यात प्रत्येकाने पुढे जायला हवे. प्रत्येकाला आपला जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण हक्क आहे. ज्याच्या सोबत आपण खुश राहू शकतो. जर तुम्ही असे करू शकता, तर तुमच्यात हिंमत आहे, आणि हा निर्णय तुम्हाला आयुष्यात सुखी राहण्यासाठी दुसरी संधी देतो. '