विवाहित Allu Arjun या बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात? म्हणाला, ती ग्लॅमरस...

पुष्पा सिनेमाच्या निमित्ताने अल्लूने अनेक मुलाखती दिल्या आहेत. 

Updated: Jan 29, 2022, 06:46 PM IST
विवाहित Allu Arjun या बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात? म्हणाला, ती ग्लॅमरस... title=

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा सिनेमाच्या रिलीजनंतर सतत चर्चेत आहे. त्याचा या सिनेमातील अभिनय चांगलाच भाव खाऊन गेला आहे. प्रेक्षकांच्या मनावर तो राज्य करत आहे. 

सध्या अल्लू अर्जुन त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. पुष्पा सिनेमाच्या निमित्ताने अल्लूने अनेक मुलाखती दिल्या आहेत. यावेळी अल्लू अर्जुनला फेवरेट बॉलिवूड अभिनेत्री कोण आणि का असा प्रश्न विचारण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

ज्याचं उत्तर देत अल्लू अर्जुनने दीपिका पादुकोण हीचं नाव घेतलं आहे. दीपिकाची स्तुती त्याने यावेळी केली आहे. अल्लू दीपिकाच्या अभिनयाच्या प्रेमात पडला आहे. अल्लू अर्जुन यावेळी म्हणाला, "ग्लॅमर आणि व्यावसायिक चित्रपटांचा विचार केल्यास, मला दीपिका पादुकोण आवडते ती एक अष्टपैलू सौंदर्यवती आहे."

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची सुपरस्टार आहे.  तिच्या अभिनयावर चाहते फिदा आहेत. सोबतच तिच्या स्टाईलची ही चांगलीच चर्चा असते. आता साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने ही दीपिका बाबतची आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे दीपिकाची साऊथमध्ये चांगलीच हवा असल्याचं दिसून येत आहे. 

अल्लू अर्जुन सोशल मीडियावरील पोस्ट मुळेही बऱ्याचदा चर्चेत असतो. तो फॅमिलीसोबतचे खास मुव्हमेंट शेअर करत असतो.