Masaba Gupta Golden Bikini Dress: सध्याची फॅशन ही फार बदलली आहे. त्यातून सेलिब्रेटी हे अनेकदा विविध फॅशन स्टाईल्स फोलो करताना दिसतात. सोनम कपूरच्या फॅशन स्टाईलची सर्वत्र चर्चा असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या खास मैत्रीणीची. ही आहे मसाबा गुप्ता. मसाबा गुप्ता ही स्वत: एक फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चाही असते. सोशल मीडियावरही तिची जोरात चर्चा रंगलेली असते. तिच्या फॅशनमध्येही कसलीच कमी नाही. सध्या तिनं आपलं असंच एक हॉट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्याची बरीच चर्चा आहे. यावेळी तिनं कॅरी केलेली आगळीवेगळी फॅशन पाहून सर्वच जणं आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी तिनं न्यूड ग्लोड बिकीनीवरती काळ्या रंगाचा कटगाऊन परिधान केला आहे.
सध्या तिच्या या हॉट लुकमुळे चर्चांना उधाण आलं आहे. आई नीना गुप्ता यांनीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक केले आहे. सध्या सेलिब्रेटी हे आपल्या फॅशन स्टाईल्समध्ये विविध प्रयोग करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या ड्रेसची बरीच चर्चा होती. त्यावरून ती प्रचंड ट्रोल झाली होती. त्यात तिनं टाईट ब्रालेट ड्रेस घातला होता. त्यानंतर नुकत्याच एका कार्यक्रमाला पोहचलेल्या तमन्ना भाटियाच्या ड्रेसचीही चर्चा होती. तिनंही ऑफ शोल्डर गोल्डन रंगाचा मेटलचा ड्रेस घातला होता. तिच्यावरून तिची सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगलेली होती. सध्या सेलिब्रेटी असे प्रयोगही करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या फॅशन सेन्सकडे आणि स्टाईलकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही प्रचंड बदलला आहे.
नीना गुप्ता यांनी या फोटोखाली 'ये हुना ना बात' अशी कमेंट केली आहे. त्यांच्या कमेंटनंही सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तिच्या या लुकनं तिनं करीना कपूरलाही मागे सोडले आहे. त्यातून मलायका अरोरालाही कॉम्प्लेक्स येईल अशी तिची ही फॅशन पाहून तिचे चाहत्यांनी कौतुकही केले आहे. यावेळी तिनं केस मोकळे सोडले आहेत. सोबतच तिनं हातातही भल्या मोठ्या लाकडाच्या बांगड्या घातल्या आहेत. ज्याची सर्वत्र चांगलीच चर्चा आहे.
तिनं शिमरचा न्यूड लुकही केला आहे. यावेळी तिला काहींनी ट्रोलही केलं आहे. सारा तेंडूलकर, करीना कपूर, श्रीया पिळगावंकर, शोभिता धुलिपाला अशा अनेक सेलिब्रेटींनी तिच्या या फोटोवर कमेंटही केल्या आहेत. यावेळी करीना कपूर म्हणाली की, 'व्वा हॉटी... आता पुढे फक्त तुझीच हवा बाकी कोणी नाही...' यावर मसाबा गुप्ता म्हणाली की, 'हो, हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकतेय'