मुलगी मसाबा गुप्ताला आई नीना गुप्ता यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर कळलं हे कटू सत्य

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

Updated: Jul 24, 2021, 09:02 PM IST
मुलगी मसाबा गुप्ताला आई नीना गुप्ता यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर कळलं हे कटू सत्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने एका गोष्टीचा खुलासा केला आहे. ज्याविषयी तिला तो पर्यंत माहिती नव्हतं जोपर्यंत तिची आई नीना गुप्ता यांनी ऑटोबायोग्राफी 'सच कहूं तो' लाँच केलं होतं. मसाबाने एक दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी 'आस्क मी एनीथिंग' सेशन ठेवलं होतं.

यादरम्यान, मसाबा गुप्ताच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. मसाबाने त्यांना याची उत्तर देखील फार हुशारीने दिली आणि एक खुलासा केला. एका चाहत्याने मसाबाला विचारलं, "नीना जी यांच्या सच कहूं तोया ऑटोबायोग्राफी आधी तुला काय माहित नव्हतं?"

मसाबा गुप्ताने उत्तर दिलं की, "मला माहित नव्हतं की, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा तिच्याकडे पैसे नव्हते आणि मला हेसुद्धा माहित नव्हतं की, मला जन्म देण्यासाठी देखील तिच्याकडे पैसे नव्हते, मी कुठच्यातरी एका ऑपरेशन (सी-सेक्शन)ने झाले होते . खरोखर हे खूप हृदयद्रावक होते."

आईच्या बँक खात्यात 2 हजार रुपये
मसाबा गुप्ताने मे महिन्यात नीना यांच्या ऑटोबायोग्राफीमधील एक भाग इंस्टाग्रामवर शेअर केला होता, त्यात मसाबाच्या जन्माच्यावेळी तिच्या आर्थिक परिस्थितीविषयी पोस्टमध्ये असं लिहिलं होतं, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईच्या बँक खात्यात फक्त 2000 रुपये होते. आणि मी सी-सेक्शन बाळ होते."