सचिन तेंडुलकरने केलं 'पंचक' सिनेमाचं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाला...

आपल्या अवतीभवती घडणारा विषय घेऊन प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित 'पंचक' चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. प्रेक्षकांसह, मराठी सिनेसृष्टीसह हा चित्रपट बॉलिवूडकरांच्याही पसंतीस उतरत आहे. 

Updated: Jan 14, 2024, 08:22 AM IST
सचिन तेंडुलकरने केलं 'पंचक' सिनेमाचं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाला... title=

मुंबई : आपल्या अवतीभवती घडणारा विषय घेऊन प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित 'पंचक' चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. प्रेक्षकांसह, मराठी सिनेसृष्टीसह हा चित्रपट बॉलिवूडकरांच्याही पसंतीस उतरत आहे. अवघ्या महाराष्ट्र्रात या चित्रपटाची चर्चा होत असतानाच आता या चित्रपटाचे कौतुक खुद्द क्रिकेटर सचिन तेंडुलकरने केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून 'पंचक'चे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

''अनेक कॅरेक्टर्स आणि त्याहूनही जास्त विनोदी. 'पंचक' हा फॅमिली बरोबर बघण्यासारखा आणि खूप खूप हसवणारा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकरांची ऍक्टिंग चित्रपटाला अजून समृद्ध करेल. निर्माते माधुरी दीक्षित नेने, डॉक्टर श्रीराम नेने ह्यांना मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी धन्यवाद.'' या शब्दांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.  
 
'पंचक' हा चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित झाला असून डॉ.श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित निर्मित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ अशुभ घडले की ते पाच पटीनं वाढतं असं म्हटलं जातं. याच संकल्पनेवर आधारित 'पंचक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा  चित्रपट सध्या जबरदस्त गाजत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती ही डॉ. श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने यांनी केली आहे. तर नितीन प्रकाश वैद्य हे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे.

पंचक म्हणजे काय? 
पुराणातील काही उल्लेखांनुसार, रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला तो काळ हा पंचकाचा होता, अशी मान्यता आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला होणं अशुभ मानलं जातं. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पुढील काळात कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असतं, असा दावा शास्त्रात करण्यात आला आहे.