मुंबई : झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका आहे. या मालिकेत दिवसेंदिवस ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गुरूच्या कंपनीवर केस दाखल झाल्यामुळे सध्या सगळीकडून त्याला ऐकून घ्यावं लागत आहे. जीवन कंपनीच्या मालकांना भेटण्यासाठी स्वतः गुरू जातो. त्यांची माफी मागून त्यांना आपल्या कंपनीसोबत केलेला करार सुरू ठेवण्यास सांगतो. मात्र जीवन कंपनीच्या मालकांनी राधिका मसाले खूप चांगल काम करत असल्याचं सांगत तुम्ही त्यांची माफी मागून राधिका मसालेची मदत घ्या असं सांगितलं. यावेळी गुरूला सर्वात पहिला धक्का बसला पण पर्याय नसल्यामुळे आता तो काय करेल हे पाहणं गरजेचं असणार आहे.
माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून शयानामुळे खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. शयानासोबत साखरपुडा करून गुरूनाथ वेगळा झाला खरा पण त्याच्या मागील संकट काही संपायची नावं घेत नाहीत. एका बाजूला शनाया शॉपिंग करून गुरूचे पैसे संपवत आहेत. तर तिथे ऑफिसमधून सगळेच गुरूच्या कामावर नाराज आहेत. त्यामुळे पुढे काय होतं हे पाहण्यासाठी zee5 च्या या लिंकवर क्लिक करा...
संकटातून सुटका करून घेण्यासाठी गुरू राधिकाच्या पायाशी जाईल की आपला इगो सांभाळत तो परिस्थितीत आणखी खाली कोसळेल. हे पाहणं गरजेचं असणार आहे.