माझ्या नवऱ्याची बायको : राधिकाला कोर्टात न्याय मिळणार का?

काय होणार कोर्टात 

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला दिवसेंदिवस वेगळं वळण मिळत आहे. यावेळी राधिकाने स्वतः गुरूनाथला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि अगदी त्याप्रमाणे राधिकाने गुरूनाथला नोटीस देखील पाठवली आहे. राधिकाचा हा निर्णय सुरूवातीला कुणालाच पटणारा नव्हता. अगदी गुरूनाथची आई देखील या घटस्फोटाविरूद्ध असते. ती आपल्यापरीने गुरूनाथला आणि राधिकाला समजावण्याचा प्रयत्न करते. पण तिचे हे प्रयत्न अगदी फेल होतात. आणि गुरू - राधिका घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. 

गुरूनाथ राधिकेच्या नोटीसला पाठवतो उत्तर 

राधिकाने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर गुरूनाथ त्याला प्रतिउत्तर देतो. मात्र त्या नोटीसमध्ये गुरूनाथ राधिकावर नको ते आरोप लावतो. राधिकाने अथर्वला चांगले संस्कार दिले नाहीत. राधिका चांगली आई नाही असे आरोप गुरूनाथने राधिकावर लावले. या आरोपांमुळे राधिका कालमडते पण ती हे आरोप मान्य न करता कोर्टात जाण्याचा निर्णय घेते. पण गुरूनाथच्या आईचा गुरूनाथचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही.