शाहीदच्या पत्नीवर आली पतीच्या एक्स-गर्लफ्रेन्डच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालण्याची वेळ

मिरा कपूरवर आली अशी वेळ कारण...  

Updated: Oct 15, 2021, 08:21 AM IST
शाहीदच्या पत्नीवर आली पतीच्या एक्स-गर्लफ्रेन्डच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालण्याची वेळ

मुंबई : सर्वचं बॉलिवूडकरांचा फिरण्याचा अड्डा झालाय मालदीव... व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कलाकार मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जातात.  प्रत्येक दिवशी एक तरी सेलिब्रिटी मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासोबत  नाहीतर मित्रपरिवारासोबत गेल्याचं समजतं. आता अभिनेता शाहीद कपूर आणि पत्नी मिरा राजपूत मालदीवमध्ये त्यांच्या दोन मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. दोघे मालदीवमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

mira rajput

काही दिवसांपूर्वी शाहीदचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पत्नी मिरा राजपूतचा मिरर सेल्फी सध्या चर्चेत आला आहे. फोटोमधील मिराच्या बिकिनी लूकने सर्वांना घायाळ केलं आहे. मिराचा मिरर सेल्फी बिकिनी लूक पाहून असं वाटत आहे की ती शाहीदची एक्स-गर्लफ्रेन्ड करीना कपूरला फॉलो करते. 

कारण काही दिवसांपूर्वी करीना देखील मालदीवला पोहोचली होती. तेव्हा तिने असाचं मिरर सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला. आता शाहीदच्या पत्नीने देखील मिरर सेल्फी शेअर केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.