रणवीर सिंगकडे आता लपवण्यासारखं काय? न्यूड फोटोशूटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

'त्यांच्याकडे आता लपवण्यासारखं...', रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस   

Updated: Jul 23, 2022, 10:17 AM IST
रणवीर सिंगकडे आता लपवण्यासारखं काय? न्यूड फोटोशूटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस  title=

मुंबई : अभिनेता रणबीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याच्या न्यूड फोटोमुळे खळबळ माजली आहे. कायम विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरने  न्यूड फोटोशूट केल्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. ऐकीकडे अभिनेत्याच्या फोटोशूटला अनेकांनी विरोध केला आहे. पण रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. 

रणवीर सिंगवर टीका होत आहे
खरतर, या वादग्रस्त फोटोशूटनंतर आता रणवीर सिंगवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. ज्याच्या आधारे रणवीर सिंग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. या फोटोशूटसाठी लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत. एवढंच नाही तर पश्चिम बंगालच्या टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही रणवीर सिंगच्या फोटोशूटवर कमेंट केली  आहे.