'टेलर स्विफ्टने माझे आयुष्य खराब केलं', मिया खलिफाचा मोठा आरोप

पण मियाने टेलर स्विफ्टवर इतका मोठा आरोप का लावला? याबद्दल लोकांना प्रश्न पडला आहे.

Updated: Nov 21, 2021, 03:43 PM IST
'टेलर स्विफ्टने माझे आयुष्य खराब केलं', मिया खलिफाचा मोठा आरोप title=

मुंबई : मिया खलिफा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी  अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते. मिया सोशल मीडियावरती तिचे नवनवीन फोटो आणि काही व्हिडीओ ती शेअर करत असते. एकेकाळी पॉर्न इंडस्ट्रित काम करणारी मिया सध्या या इंडसट्रीमधून बाहेर पडली आहे. परंतु तरीही तिची फॅन फॉलोअिंग काही कमी झालेली नाही. दरम्यान, मियाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला सध्याचा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

मियाने रडताना एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टवर तिचे आयुष्य खराब केल्याचा आरोप करत आहे. मियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पण मियाने टेलर स्विफ्टवर इतका मोठा आरोप का लावला? याबद्दल लोकांना प्रश्न पडला आहे.

मिया खलिफाने अलीकडेच टेलर स्विफ्टचे 'ऑल टू वेल' गाणे ऐकताना एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या कुत्रासोबत दिसत आहे.

'ऑल टू वेल' हे टेलर स्विफ्टचं गाणं पुन्हा रेकॉर्ड केलं गेलं आहे, म्हणजेच हे रीक्रियेटेड गाणं आहे, जे या आठवड्याच्या सुरुवातीला रिलीज झालं आहे. टेलर स्विफ्ट दिग्दर्शित हे 10 मिनिटांचे गाणे एखाद्या शॉर्ट फिल्मसारखे आहे.

मिया खलिफा ही टेलर स्विफ्टची खूप मोठी फॅन आहे, हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही. सोशल मीडियावर मियाने टेलरबद्दल काही बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिचा रडणारा व्हिडीओ शेअर करताना, मियाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'ऑल टू वेल' या दहा मिनिटांच्या गाण्याने ब्लॉंडीने (टेलर स्विफ्ट) माझे आयुष्य खराब केले. मियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, जो आता काढून टाकण्यात आला आहे.

टेलर स्विफ्टने अलीकडेच तिचा रेड अल्बम पुन्हा रेकॉर्ड केला आहे. टेलरचे 'ऑल टू वेल' हे गाणे रिलीज होताच टेलरचे चाहते आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. टेलरचे हे गाणे सर्वांनाच आवडत आहे. कार्डी बीने या गाण्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मला ते खूप आवडले.

ग्रेशिया अबरामने या गाण्यावर तिच्या एका ट्विटमध्ये प्रतिक्रिया दिली आहे की, "हाय टेलर स्विफ्ट मला फक्त हे सांगायचे आहे मला आशा आहे की, तु आनंदी अशील. 10 मिनिटे हे गाणे ऐकल्यानंतर माझे हृदय तुटते आहे. मला अजूनही माझे हात असल्याची जाणीव होत नाही आणि माझ्या हृदयाचे ठोके असामान्य आहेत, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तसेच टेलरच्या या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.