मिका सिंगचं स्वयंवर; वयाच्या 44 व्या वर्षी चढणार बोहल्यावर

गायक मिका सिंग लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झाला आहे

Updated: Mar 29, 2022, 09:49 PM IST
मिका सिंगचं स्वयंवर; वयाच्या 44 व्या वर्षी चढणार बोहल्यावर  title=

मुंबई : गायक मिका सिंग लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. मिकाने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर सांगितलं की, तो लवकरच स्वयंवर - मीका दी वोहती' या रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे. शोमध्ये मिका त्याच्या लाइफ पार्टनरच्या शोधात दिसणार आहे. अनेक मुली त्याच्या स्वयंवरमध्ये लग्नासाठी येथे सामील होतील. त्यापैकी मिका स्वत:साठी योग्य जीवनसाथी निवडणार आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना  मिकाने म्हणाला की, आधी तो लग्नासाठी तयार नव्हता, कारण त्याचं सगळं लक्ष त्याच्या कामावर केंद्रित होतं. पण मोठा भाऊ आणि पॉप सिंगर दलेर मेहंदीचा सल्ला घेतल्यानंतर, मिकाला वाटलं की, आता सेटल होण्याची वेळ आली आहे. मुलाखतीत मिका पुढे म्हणाला की, "मी आधी तयार नव्हतो. गेल्या 20 वर्षांत मी किमान 100-150 स्थळं नाकारली असतील. कारण तेव्हा माझं काम माझ्यासाठी महत्त्वाचं होतं."

त्याची गर्लफ्रेंड असूनही,  त्याने कधीच आपल्या गर्लफ्रेंडची त्याचा मोठा भाऊ दलेर मेहंदीशी ओळख करून देण्याचं धाडस केलं नाही.  याबद्दल बोलताना मिका म्हणाला की, '' माझ्यात इतकं धाडस कधीच आलं नाही की, मी माझ्या गर्लफ्रेंडची दलेर पाजी किंवा माझ्या कुटुंबीयांशी ओळख करून देऊ शकेन. दलेर पाजीची माझ्या गर्लफ्रेंडशी ओळख करून देण्याचं धाडस मी कधीच केलं नाही. आमच्या कुटुंबात असं नाही की कोणाचा दबाव आहे. पण हा त्यांचा सन्मान आहे जो मला ते करण्यापासून कायम रोखतो.'