रश्मिका मंदानाने बॉलिवूड एक्ट्रेसच्या हातून काढून घेतला बिग बजेट सिनेमा; कोण आहे ती अभिनेत्री पाहा

 रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे

Updated: Mar 29, 2022, 08:54 PM IST
रश्मिका मंदानाने बॉलिवूड एक्ट्रेसच्या हातून काढून घेतला बिग बजेट सिनेमा; कोण आहे ती अभिनेत्री पाहा title=

मुंबई : 'पुष्पा' चित्रपटातून घराघरात पोहचणारी श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुष्पा चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी रश्मिका प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. तिची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, श्रीवल्लीने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हातून एक मोठा चित्रपट काढून घेतला आहे.

परिणीति चोप्राला केलं रिप्लेस
बॉलीवूडलाइफनुसार, निर्मात्यांनी परिणीती चोप्राला 'अॅनिमल' चित्रपटातून आधीच वगळलं होतं. आता या चित्रपटात परिणीतीची जागा रश्मिका मंदान्नाने घेतली आहे.

या कारणामुळे मेकर्सने घेतला मोठा निर्णय 
रश्मिका मंदान्नाने 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटाबाबत चित्रपट निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना वाटतं की, रश्मिका या चित्रपटासाठी योग्य आहे. यासोबतच या चित्रपटासाठी निर्मात्यांना नवीन चेहरा हवा होता.

रणबीर कपूरसोबत शेअर करणार स्क्रिन
रश्मिका मंदान्ना 'अ‍ॅनिमल' चित्रपटात बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. रणबीर लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरू करू शकतो. अशीही बातमी आहे. 'अॅनिमल' चित्रपटात रणबीर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अनिल कपूर आणि बॉबी देओलही मुख्य भूमिकेत आहेत.