मुंबई : देशात सर्वत्र कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्वांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय मालिका, चित्रपटांचं शूटींग देखील बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे चाहते त्यांचे आवडते सेलिब्रिटी ‘क्वारंटाइन टाइम’ कशा प्रकारे व्यतीत करत आहेत हे जाणून घेण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.
याच दरम्यान, गायक मिका सिंगच्या ‘क्वारंटाइन लव्ह’ची चर्चा सुरू झाली आहे. मिका अभिनेत्री चाहत खन्नाला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगत आहेत. चाहतने मिका सिंगसोबत काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेमाचा गुलाब बहरतोय की काय.. असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
चाहतने काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'क्वारंटाइन लव्ह' असं लिहिलं आहे. यामुळे तिच्या या फोटोवर चाहते चांगल्याच प्रतिक्रिया देत आहेत. या दोघांचा ‘क्वारंटाइन लव्ह’ या नावाने अल्बम येत असल्याने त्यांनी असे फोटो टाकले असावेत, असा अंदाज देखील एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे. तर काही दोघं पब्लिसिटीसाठी सर्व काही करत असल्याचं म्हणत आहेत.
चाहत बद्दल सांगायचं झालं तर, 'बड़े अच्छे लगते हैं' मालिका फेम अभिनेत्री चाहत खन्नाने भारत नरसिंघानीसोबत केले होते. पण तिचं हे लग्न फार काळ काही टिकलं नाही. अवघ्या ७ महिन्यांमध्ये ते विभक्त झाले.