५० वर्षाचा हा बॉलिवूड अभिनेता लवकरच करणार लग्न

देशाचा पहिला सुपर मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमन.... 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 19, 2017, 01:12 PM IST
५० वर्षाचा हा बॉलिवूड अभिनेता लवकरच करणार लग्न  title=

मुंबई : देशाचा पहिला सुपर मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमन.... 

मिलिंद सोमण  गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे आपल्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या मुलीला करत आहे डेट. यासाठी सोमण आणि अंकिता अनेकदा ट्रोल देखील झाले आहेत. आणि तेव्हापासून ते भरपूर चर्चेत आहेत. अंकिता कोनवारला मिलिंद सोमण कित्येक दिवसांपासून डेट करत आहे. दोघे लवकरच अंकितासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे पुढल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये लग्न करणार आहेत. 

कधी करणार लग्न?

अंकिताचे वय हे २३ किंवा २४ असू शकेल तशीच ती एअरहोस्टेस असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मिलिंद ५२ वर्षाचे असून स्पॉटलाइटने दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद नुकतेच अंकिताच्या कुटुंबाला भेटले आहे. आणि हे दोघे लवकरच सगळ्यांच्या सहमतीने लग्न करणार आहे. मिलिंदने अंकिताच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तिच्या भाच्याच्या बर्थ डे पार्टीचं निमित्त निवडलं. याच दरम्यान संपूर्ण कुटुंबियांची ओळख झाली. 

अंकिताच्या कुटुंबातील सगळेजण त्या दोघांच्या वयाच्या अंतरातील फरकामुळे चिंतेत होते. मात्र एकदा मिलिंदला भेटल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आहेत. आणि त्यांनी मिलिंद सोमणला एका खरेपणाने स्विकारलं आहे. या कुटुंबियाला मिलिंदचा स्वभाव भरपूर आवडला असून त्यांनी लग्नाला मंजूरी दिली आहे. 

या दोघांचं नातं समोर आलं तेव्हा भरपूर चर्चा रंगल्या. दोघांमधील अंतर हाच कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. मिलिंदचं हे दुसरं लग्न असणार आहे. या अगोदर मिलिंद सोमणने अभिनेत्री मिलिन जॅम्पेनोईसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न फक्त ३ वर्षच टिकलं. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.