वाढदिवसापूर्वी तैमुरची घोडेसवारी...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांच्या चिमुकल्याचा बुधवारी पहिला वाढदिवस आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 19, 2017, 11:32 AM IST
वाढदिवसापूर्वी तैमुरची घोडेसवारी... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांच्या चिमुकल्याचा बुधवारी पहिला वाढदिवस आहे. त्याचा पहिला वाढदिवस पतोडी पॅलेसला साजरा करण्यात येणार आहे.

जोरदार तयारी सुरू

वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी ते तिघे एअरपोर्टवर स्पॉट झाले. अलीकडेच करिश्मा कपूरने वाढदिवसाच्या तयारीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तर त्याचा अजून एक फोटो समोर येत आहे. त्यात तैमुर सैफसोबत घोडेसवारी करताना दिसत आहे. तर करिना शेजारी उभी आहे. हा फोटो अत्यंत सुंदर आहे.

 

 

 

#prebirthdaycelebrations #babynawab #familyfun #perfectpic

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

फॅमेली गेट टू गेदर

तैमुरच्या वाढदिवसानिमित्त फॅमेली गेट टू गेदरचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र जवळच्या मित्रमंडळींना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. शाहरूख अब्राहमसोबत तर करण जोहर आपल्या जुडवा मुलांसह म्हणचे यश आणि रूहीसह पार्टीत सहभागी होणार आहेत. तर सोहा अली खान देखील तैमुरच्या पहिल्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी होईल. 

 

 

#lazymondaysbelike#familyfun #pataudidiaries

A post shared by KK (@therealkarismakapoor) on