मुंबई : 'मिर्झापूर' (Mirzapur), 'सेक्रेड गेम्स' या आणि अखा कैक वेब सीरिजमध्ये असणाऱ्या इंटिमेट सीनची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कथानकांच्या गरजेनुसार या कलाकृतींमध्ये बोल्ड दृश्यांची जोड देण्यात आली आहे.
या दृश्यांकडे सीरिजचा भाग म्हणून पाहणारा आणि विचित्र नजरेनं पाहणारा, असे दोन वर्ग. मुळात अशी दृश्य साकारणं हे कलाकारांसाठीही सोपं नसतं.
महत्त्वाची बाब अशी, की जी दृश्य कलाकारांना आव्हानात्मक वाटतात, त्यांना भावनिक विवंचनेत टाकतात अशाच दृश्यांची खिल्ली उडवली जाते, त्याकडे अभद्र नजरेतून पाहिलं जातं.
इंटिमेट सीन मोठ्या ताकदीनं साकारणाऱ्या काही कलाकारांमध्ये अभिनेत्री रसिका दुग्गल हिचंही नाव समोर येतं.
'मिर्झापूर' (Mirzapur) मध्ये रसिकाच्या भूमिकेला आणि तिच्या बोल्ड दृश्यांना बरीच लोकप्रियता मिळाली.
पण, यानंतरही आलेल्या Out of love या सीरिजमध्ये रसिकानं कैक पटींनी जास्त बोल्ड सीन साकारला.
मीरा कपूर, हे पात्र तिनं या सीरिजमध्ये साकारलं होतं. जिथं पूरब कोहली याच्यासोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसली होती.
रसिकाला या सीरिजमधील इंटिमेट सीनदरम्यान भावना अनावर झाल्याचं तिचा अभिनय पाहून लक्षात आलं. अतिशय प्रत्ययकारी असं दृश्य तिनं कमाल ताकदीनं साकारलं होतं.
रसिकानं आतापर्यंत साकारलेल्या बोल्ड दृश्यांमध्ये या सीरिजमधील दृश्यांवरच अनेकांच्या नजरा खिळल्या.