Harnaaz Kaur Sandhu photos: Fat to Fit हरनाझ संधूचा बदललेला किलर लूक

हरनाज कौर संधूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये  ती खूपच सुंदर दिसत आहे.

Updated: May 17, 2022, 09:42 AM IST
Harnaaz Kaur Sandhu photos: Fat to Fit हरनाझ संधूचा बदललेला किलर लूक title=

मुंबईः मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिची किलर स्टाईल पाहायला मिळत आहे. हरनाजचे हे फोटो लोकांची मने जिंकत आहेत.

किलर लूकने लोकांना घायाळ करणारी मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू दररोज प्रसिद्धीच्या झोतात राहते. तिचे फोटो सोशल मीडियावर दररोज धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा हरनाजने आपल्या सौंदर्याची जादू मध्यंतरी दाखवली असून तिचं हे रूप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

हरनाज कौर संधू तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि मिस युनिव्हर्स दररोज तिच्या फोटो आणि व्हिडिओंनी चाहत्यांना वेड लावते. पुन्हा एकदा हरनाजने तिच्या अलीकडच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हरनाज कौर संधूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे आणि मॅचिंग प्लाझोही घातला आहे.

हरनाझने सिल्वर कलरची ब्रॅलेट घातली असून हरनाजने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी पांढऱ्या रंगाची बॅगही घेतली आहे. हरनाजने न्यूड मेकअप केला असून तिचे केस खुले ठेवले आहेत. या संपूर्ण गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोशूटमध्ये हरनाजने गॉगल घालून किलर पोज दिल्या आहेत. या फोटोंमध्ये हरनाज शर्टची बटणे उघडताना दिसत आहे. हरनाजचं असे रूप पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

मिस युनिव्हर्सच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार कमेंट केल्या आहेत. एका यूजरने Gorgeous Pic लिहिले तर दुसऱ्या यूजरने Stunning Look असे लिहिले नाही. अनेक सेलेब्सनीही चाहत्यांसह कमेंट्स केल्या आहेत.