विश्वसुंदरी मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

मानुषी कोणत्य़ा अभिनेत्यासोबत दिसणार...?

Updated: Jul 22, 2018, 10:57 AM IST
विश्वसुंदरी मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार title=

मुंबई : मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगतेयं..यशराज फिल्मसच्या आगामी सिनेमात रणवीर सिंहच्या अपोझिट मानुषीला कास्ट करण्यात आल्याचं म्हंटलं जातं. मनिष शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

याआधी मानुषी छिल्लर बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमामध्ये काम करेल असं देखील म्हटलं जात होतं. करण जोहर मानुषी छिल्लरला लॉन्च करण्यासाठी सिनेमा बनवणार आहे आणि या सिनेमात तिच्या सोबत रणबीर कपूर किंवा रणवीर सिंग दिसणार आहे अशा देखील चर्चा होत्या.

याआधी अभिनेता सलमान खान मानुषीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी उत्सुक असल्याचं देखील बोललं जात होतं. विश्वसुंदरी बनल्यानंतर अनेक चित्रपट निर्माते मानुषीला लॉन्च करण्यासाठी उत्सूक होते. मानुषीला आतापर्यंत अनेक निर्मात्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स देखील दिल्या आहेत. सलमान खान नेहमीच तरुण कलाकारांना लॉन्च करत असतो. सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी, डेझी शाह, जरीन खान, स्नेहा उलाल सारख्या अनेक अभिनेत्रींना त्यानं बॉलिवूडची दारं खुली करून दिली होती. त्यामुळे मानुषीला देखील तो बॉलिवूडमध्ये संधी देईल अशा चर्चा होत्या.