'तू आणि गरीब...' असं म्हणत मिथून चक्रवर्ती यांनी साधला कॉमेडियन भारतीवर निशाणा?

भारतीच्या संपत्तीबद्दल मिथून चक्रवर्ती जे म्हणाले त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही...  

Updated: Feb 18, 2022, 02:17 PM IST
'तू आणि गरीब...' असं म्हणत मिथून चक्रवर्ती यांनी साधला कॉमेडियन भारतीवर निशाणा? title=

मुंबई : रिऍलिटी शो 'हुनरबाज'च्या सेटवर अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि कॉमेडियन भारती सिंग यांच्यात कायम मज्जा-मस्ती सुरू असते. आता देखील दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारती, मिथून दा यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. यावेळी सेटवर अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि दिग्दर्शक करण जोहर देखील आहेत. 

व्हिडीओमध्ये भारती म्हणते, 'एक गरीब व्यक्ती काही पैसे कमवेल... यावर मिथून दा भारतीला म्हणतात.... तू आणि गरीब... आम्ही सगळे जेवढं कमवतो, तेवढं तू एकटी कमावते....' सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भारती कायम तिच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या भारती प्रेग्नेंट आहे. तरी देखील भारतीने ब्रेक न घेता, काम सुरु ठेवलं आहे. भारतीला सातवा महिना सुरु आहे.