भोजपुरी अभिनेत्रीचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर लीक

आणखी एका अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

Updated: Aug 20, 2021, 10:36 PM IST
भोजपुरी अभिनेत्रीचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर लीक title=

मुंबई : अलीकडेच भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधूचा एमएमएस लीक झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर आता भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडितच्या MSS लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. भोजपुरी अभिनेत्रीचा हा खासगी व्हिडिओ सोशल मीडियापासून यूट्यूबपर्यंत सर्वत्र व्हायरल होत आहे.

मात्र, या व्हिडिओबद्दल असे सांगितले जात आहे की हा व्हिडिओ जुना आहे आणि आता अभिनेत्रीला बदनाम करण्याच्या प्रयत्नात तो व्हायरल केला जात आहे. प्रियांका पंडितच्या नावाने टेलीग्रामवर एक पेज देखील तयार करण्यात आले आहे, ज्यावर लोक तिचे व्हिडिओ शेअर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka pandit (@priyanka_pandit_)

एका मीडिया पोर्टलशी झालेल्या संभाषणात प्रियांका पंडितने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटले आहे की, कोणीतरी तिच्याशी दुश्मनी काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ माझा नाही. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी माझ्यासारखी दिसते पण हा माझा व्हिडिओ नाही. असं तिने म्हटलंय.

कोण आहे प्रियांका पंडित?

भोजपुरी चित्रपटांमध्ये प्रियंका पंडित हे एक मोठे नाव आहे. प्रियंकाने भोजपुरीच्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. 'पवनपुत्र', 'इच्छाधारी', 'आवारा बालम', 'करम युग' आणि 'तोड दे दुश्मन की नली' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.