मुंबई : ख्यातनाम गायक मिका सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मिका सिंग अमेरिकेत १२ आणि १३ ऑगस्टला गाण्यांचा कार्यक्रम करणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी मिकानं जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये 'हमारा पाकिस्तान' असा उल्लेख केल्यानं आक्षेप घेतला जातोय.
मिकावर टीका करत 'अमेरिकेत हमारा कॉन्सर्ट करतोस... आता महाराष्ट्रात माईक तर पकडून दाखव' असा इशारा मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिलाय.
तर, भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणारे लोक हे देशद्रोहीच आहेत. त्यामुळे त्यांना फाशीच दिली पाहिजे, असं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलंय. तर