आवडतात मुलं, पण मुलीशीही लग्न करेन; Bisexual अभिनेत्रीची खळबळजनक कबुली

एक मोठा खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे. 

Updated: Aug 12, 2021, 06:34 PM IST
आवडतात मुलं, पण मुलीशीही लग्न करेन; Bisexual अभिनेत्रीची खळबळजनक कबुली  title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस' यावेळी ओटीटीच्या माध्यमातून सुरू झाला आहे. या शोच्या माध्यमातून अनेक खुलासे देखील होत असतात. असाच एक मोठा खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे. 

मूसकडून वैयक्तिक रहस्यं उघड 
शोचा हा नवा सीझन सुरू होताच त्यात मारामारी आणि वादांची मालिका सुरु झाली आहे. याचबरोबर मूस जट्टाना या शोची स्पर्धक सतत चर्चेत असते. शो मध्ये आल्यानंतर, तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. या शोमध्ये तिने अलीकडेच प्रतीकसोबत बोलत असताना सांगितलं की, ती एक बाइसेक्सुअल आहे.

मुलं आकर्षित होतात
मूस जट्टाना म्हणाली की, तिला मुलांकडे जास्त आकर्षण वाटतं पण मुलींसोबतही तिचं नातं तितकंच महत्वाचं आहे. तिने बोलताना स्पष्टपणे सांगितलं की, जर तिचं नातं एखाद्या मुलीशी मुलापेक्षा चांगलं असेल तर तिला त्या मुलीबरोबर सेटल होण्यास काहीच प्रॉब्लेम नसेल.

निशांत भट्टचं कनेक्शन म्हणून मूस जट्टानाने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे पण प्रतीकसोबतचे तिचं नातं चांगलं होत आहे. हेच कारण आहे की, ती आतापर्यंत शोमध्ये सर्वाधिकवेळा प्रतीकसोबत दिसली आहे. या व्यतिरिक्त, मूसने तिच्या सर्वात वैयक्तिक गोष्टी देखील प्रतीकसोबत शेअर केल्या आहेत. ज्यावरून हे सिद्ध होत आहे की, तिचं प्रतिकशी खूप चांगलं बाँडिंग होत आहे.