'...याच कारणामुळे पुन्हा वजन कमी करता आलं' अभिनेत्रीची भावुक पोस्ट शेअर

अभिनेत्री हिना खान काही काळापासून चर्चेत आहे.

Updated: Oct 21, 2021, 09:41 PM IST
'...याच कारणामुळे पुन्हा वजन कमी करता आलं' अभिनेत्रीची भावुक पोस्ट शेअर

मुंबई : अभिनेत्री हिना खान काही काळापासून चर्चेत आहे. हिनाचे वडील अस्लम खान यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. दरम्यान, हिनाचं वजनही खूप वाढल्याचं वृत्त आलं होतं. या सगळ्या बातम्यांमध्ये, हिना खानने स्वतः एका पोस्टद्वारे सांगितलं आहे की, तिचं वजन वाढलं आहे पण तिने वजन कमी करण्यापेक्षा तिच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. आणि पुन्हा एकदा हिना खान पूर्णपणे फिट आणि शेपमध्ये आली आहे.

हिनाने अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'होय, काही स्पष्ट कारणांमुळे माझं वजन काही किलोनं वाढलं होतं आणि माझं वजन किती किलो वाढलं आहे याकडे मी लक्ष दिलं नाही. माझं मानसिक आरोग्य माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी फक्त त्या गोष्टींची काळजी घेतली ज्यामुळे मला आनंद होतो.

कधीकधी स्वतःसाठी वेळ काढा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवा... लोक काय विचार करतील आणि तुम्ही कसे दिसता याचा विचार न करता तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आयुष्यात काहीही करण्यासाठी, संतुलित मन असणं फार महत्वाचं आहे... म्हणूनच मी शारीरिक स्वरूपापूर्वी मानसिक आरोग्य निवडलं... आणि आता मी पुन्हा वजन कमी केलं आहे.

हिना खानचा्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, हिना बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. त्याचबरोबर हिना अलीकडेच 'मैं भी कचरा' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 15 मिलीयन फॉलोअर्स आहेत.