Shilpa Shetty ला जेव्हा साधूने केलं होतं KISS, अभिनेत्रीने दिलं हे स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा चर्चेत असते. 

Updated: Oct 21, 2021, 08:42 PM IST
Shilpa Shetty ला जेव्हा साधूने केलं होतं  KISS, अभिनेत्रीने दिलं हे स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा चर्चेत असते. ती फिल्म इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती कायम अॅक्टिव्ह असते. पण या अभिनेत्रीसोबत अनेक वाद देखील जोडलेले आहेत. याचाच एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका साधूसोबत दिसत आहे.

जेव्हा साधूने केली होती किस
2009 मध्ये ओरिसाच्या सखीगोपाल मंदिराच्या एका साधूने शिल्पा शेट्टीच्या गालाला किस केलं होतं. हा फोटो समोर येताच बराच गोंधळ उडाला. नंतर यावर स्पष्टीकरण देताना शिल्पा म्हणाली की, ते साधू माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. बाप आपल्या मुलीच्या गालाला किस करु शकत नाही का? मात्र, आजपर्यंत शिल्पा या फोटोसाठी बरीच ट्रोल झाली आहे. हा फोटो जरी जुना असला तरी सध्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

हेअरकटचा व्हिडिओ केला होता शेअर 
शिल्पा शेट्टीने नुकताच केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये, ती एका झटक्यात तिच्या डोक्याच्या खालच्या भागावरचे केस कसे कापते हे पाहिलं जाऊ शकते. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आणि हे असंच घडलं. हे करताना वाहिद माझ्यापेक्षा जास्त घाबरला होता.

शिल्पा शेट्टीचं वर्कफ्रंट
शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर 4' मध्ये जज म्हणून दिसली होती, अभिनेत्री 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये जजची खुर्चीही घेणार आहे. तर दुसरीकडे, ती शब्बीर खानच्या 'निकम्मा' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया यांच्याही भूमिका आहेत. ती शेवट  'हंगामा 2' मध्ये दिसली होती जो डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता.