'८३' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी '८३' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. 

Updated: Jan 26, 2020, 04:36 PM IST
'८३' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई : अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या आगामी '८३' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित होत आहे. आता चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर प्रदर्शित झाला. त्यामुळे चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधीक शिगेला पोहोचली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्य संपूर्ण चित्रपटाची टीम दिसत आहे. तर चित्रपटाचा हा पोस्टर अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या सोशल माडिया अकाउंडच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

ThisIs83 @ikamalhaasan @kabirkhankk @rkfioffl @deepikapadukone @sarkarshibasish @ipritamofficial @vishnuinduri #SajidNadiadwala @reliance.entertainment @fuhsephantom @vibrimedia @nadiadwalagrandson @ynotxworld @sash041075 @apinternationalfilms @zeemusiccompany @83thefilm . @pankajtripathi @tahirrajbhasin @actorjiiva @saqibsaleem @thejatinsarna @iamchiragpatil @dinkersharmaa @nishantdahhiya @harrdysandhu @issahilkhattar @ammyvirk @adinathkothare @dhairya275 @rbadree

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

प्रजासत्ताक दिनाचे दिनाचे औचित्य साधत चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तो माजी क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. 

१९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपवर '८३' चित्रपट आधारित आहे. चित्रपटात दीपिका, कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. येत्या १० एप्रिल रोजी '८३' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

रणवीर सिंह, ताहिर राज भसीन आणि जीवा व्यतिरिक्त '८३' चित्रपटात चिराग पाटील, हार्डी संधू, साहिल खट्टर, साकिब सलीम, दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी आणि इतरही कलाकार भूमिका साकारणार आहेत.