तिने नाकारलेलं अक्षय कुमारचं प्रेम

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे.

Updated: Oct 19, 2019, 06:33 PM IST
तिने नाकारलेलं अक्षय कुमारचं प्रेम

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. 'हाऊसफुल्ल ४' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच निमित्ताने त्याने नुकतीच 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. याच कार्यक्रमादरम्यान त्याने एक मोठा खुलासा केला. हा खुलासा अनेकांनाच धक्का देऊन गेला. कारण, तो अर्थातच खिलाडी कुमारच्या खासगी आयुष्याशी निगडीत होता. 

तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या अक्षय कुमारचं प्रपोजल एका तरुणीने नाकारल्याचाच तो किस्सा. याच अनुभवाविषयी सांगताना खिलाडी कुमारने आपण लाजऱ्या स्वभावाचे होतो, याबाबतही खुलासा केला. 

अक्षय एका मुलीला डेट करत होता. तो तिला डेटवर मद्रास कॅफे, उडिपी अशा हॉटेलांमध्ये नेत असे. पण, त्याने आपल्याशी प्रियकराप्रमाणेच अतिशय प्रेमळ अंदाजात वागावं, हात पकडावा अशी तिची अपेक्षा होती. पण, अक्षय कुमार हा अतिशय लाजरा असल्यामुळेच त्याला काही या गोष्टी जमल्या नाहीत. परिणामी ती मुलगी त्याला सोडून गेली. थोडक्यात काय तर, तिने त्याचं प्रेम नाकारलं होतं. 

अक्षयचं प्रेम नाकारणाऱ्या त्या मुलीचं नाव आणि इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, चाहत्यांमध्ये चर्चेसाठी मात्र त्याच्याकडून करण्यात आलेला हा इतकासा खुलासा पुरेसा ठरत आहे. 

खासगी आयुष्यातील एक मजेशीर किस्सा सांगणारा अक्षय लवकरच 'हाऊसफुल्ल ४' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून तो रितेश देशमुख, बॉबी देओल, कृती सेनन, क्रिती खरबंदा, पूजा हेगडे, चंकी पांडे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे.