close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी

मुंबई पोलिसांकडून विवेक ओबेरॉयला सुरक्षा देण्यात आली आहे.

Updated: May 23, 2019, 10:03 AM IST
विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांच्यावरील एक मीम विवेक ओबेरॉयने ट्विट केल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावरुन झालेल्या टीकेनंतर आता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे मुंबई पोलिसांकडून विवेक ओबेरॉयला सुरक्षा देण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता जूहु पोलिसांकडून विवेक ओबेरॉयला सुरक्षा देण्यात आली आहे. परंतु विवेकला मिळणाऱ्या धमक्या कोणी दिल्या हे अद्याप समोर आले नाही.  

सोनम कपूर, मधुर भंडारकर, अनुपम खेर, यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी विवेकवर सडकून टीका केली आहे. ट्विटबाबत विवेकने आधी माफी मागण्यास नकार दिला होता. परंतु सर्व स्तरातून झालेल्या मोठ्या टिकेनंतर विवेकने ट्विट डिलीट करत माफीदेखील मागितली. विवेकच्या या ट्विटचे गंभीर पडसाद उमटले असून त्याच्या या कृतीनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीसही पाठवली होती.