मुंबई : अभिनेता सोनू सून कायम गरजूंची मदत करत असतो. कोरोना काळात देखील त्याने अनेकांची मदत केली. कोरोना काळात सोनूने ज्या प्रकारे गरजूंची मदत केली त्यामुळे त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं. फक्त कोरोना काळातचं त्याने सर्वांची मदत केली नाही तर सोशल मीडियावर देखील त्याचे चाहते त्याच्याकडून मदत मागत असतात. तर सोनू देखील चाहत्यांच्या मदतीला धावतो. आता देखील सोनूने एका चाहत्याला मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे.
सोनूच्या एका चाहत्याने त्याला टॅग करत विचारलं की, 'माझी गर्लफ्रेंन्ड माझ्याकडून आय फोन मागत आहे, त्याचं काही होवू शकतं.' सोनूने चाहत्याला दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्याच्या ट्विटला उत्तर देत म्हणाला, 'काय होईल माहिती नाही. पण जर तू गर्लफ्रेन्डला आय फोन दिला तर तुझं काही राहाणार नाही.'
उसका तो पता नहीं,
अगर iphone दिया तो पर तेरा कुछ नहीं रहेगा— sonu sood (SonuSood) June 22, 2021
सोनूच्या या उत्तरानंतर चाहता म्हणाला, 'भाऊ तू माझा संसार मांडत आहे की, माझं घर तोडण्याच्या मागे लागला आहे.' सध्या चाहत्याचं आणि सोनूचं सोशल मीडियावरील ही बातचीत तुफान व्हायरल होत आहे.